loader
Breaking News
Breaking News
Foto

महावितरण गलथान कारभारामुळे लांजा शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित, पाणीपुरवठ्यावर परिणाम

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - शहरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, त्यामुळे विस्कळीत होणारा पाणीपुरवठा आणि महावितरण अधिकार्‍यांच्या उदासीन कारभाराविरोधात लांजा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष व नगरसेवक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी नगरसेवकांनी थेट महावितरण कार्यालयावर धडक देत सहाय्यक अभियंता निलेश कुलकर्णी यांना तब्बल दोन तास घेराव घालत जाब विचारला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लांजा शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार होणार्‍या वीज खंडिताचा परिणाम थेट पाणीपुरवठ्यावर होत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय महावितरण अधिकार्‍यांकडून फोन न उचलणे, नवीन विद्युत खांब उभारण्यास होणारा विलंब तसेच पावसाळ्यापूर्वी आवश्यक दुरुस्तीची कामे रखडल्याबाबतही नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शहरातील नोकरदार, व्यापारी आणि गृहिणींना वारंवारच्या वीज खंडितीमुळे होत असलेल्या त्रासाची कैफियत त्यांनी मांडली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg