loader
Breaking News
Breaking News
Foto

​'टाकाऊतून टिकाऊ' जिल्हास्तरीय स्पर्धेत कुणकेरीच्या शिक्षिका निता सावंत प्रथम

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील विनायक पर्यटन सहकारी संस्थेच्या वतीने नागरिकांच्या सर्जनशीलतेला आणि कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय खुल्या 'टाकाऊतून टिकाऊ' स्पर्धेत कुणकेरी शाळा नं. ३ च्या उपक्रमशील शिक्षिका निता नितीन सावंत यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. पर्यावरणपूरक दृष्टिकोनाला चालना देण्याच्या उद्देशाने या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ​या स्पर्धेसाठी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तब्बल ३५ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. सहभागी स्पर्धकांच्या उत्कृष्ट कलाकृतींमधून अंतिम विजेते निवडण्याचे कठीण काम यशवंतराव भोसले कॉलेजचे पोपकर आणि बांदेकर आर्ट कॉलेजचे अक्षय सावंत यांनी परीक्षक म्हणून चोख बजावले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​या स्पर्धेच्या वेळी सावंतवाडीच्या माजी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, उद्योजक सुरेश गवस, एसपीके कॉलेजचे प्राध्यापक सुधीर बुवा, मिलाग्रीज हायस्कूलच्या सेवानिवृत्त पर्यवेक्षिका मेघना राऊळ, जेष्ठ नागरिक संघाचे प्रकाश राऊळ, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव राजेंद्र बिर्जे आणि विद्या बांदेकर, अध्यक्ष दिनानाथ बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते. ​प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या निता सावंत या एक अत्यंत उपक्रमशील शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी यापूर्वीही जिल्हा, राज्य, आंतरराज्यीय तसेच राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करून अनेक पारितोषिके मिळवली आहेत. त्यांच्या या ताज्या यशामुळे त्यांच्यावर संपूर्ण जिल्ह्यातून आणि शैक्षणिक स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg