loader
Breaking News
Breaking News
Foto

उत्तराखंड ऋषिकेश येथे अखिल भारतीय महापौर परिषद कार्यक्रम समितीची सभा

ऋषिकेश - देवभूमी उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे आयोजित ’अखिल भारतीय महापौर परिषद कार्यकारी समिती’च्या महत्त्वपूर्ण बैठकीत देशभरातील महापौर सहभागी झाले आहेत. मुंबई महापौर रितू तावडेही सहभागी झाल्या आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिषदेचे अत्यंत दिमाखात उद्घाटन झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी मंचावर उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री रामसिंह कैरा, कॅबिनेट मंत्री सुबोध उनियाल, ऋषिकेशचे महापौर शंभू पासवान, परिषदेच्या अध्यक्षा रेणुबाला गुप्ता, स्थानिक आमदार डॉ. प्रेमचंद अग्रवाल, परिषदेचे महासचिव आशुतोष वार्ष्णेय यांच्यासह देशभरातून आलेले महापौर आणि मान्यवर उपस्थित होते. देशातील शहरांचा विकास, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सक्षमीकरण आणि नागरी प्रशासनातील आधुनिक बदल यांवर या परिषदेत महत्त्वपूर्ण मंथन होणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg