loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडचे सुपुत्र सचिन जाधव यांना 'उत्कृष्ट कर्मचारी' पुरस्कार

खेड : राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आयोजित मलेरिया जनजागृती व प्रतिबंध कार्यक्रमात सचिन जाधव यांना 'उत्कृष्ट कर्मचारी' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आरोग्य खात्यात क्षेत्र कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या सचिन जाधव यांनी रुग्णसेवेला प्राधान्य देत कामकाजाची छाप उमटवली आहे. आपल्या कार्यक्षेत्रात कीटकजन्य आजार नियंत्रण, सर्वेक्षण, रुग्ण शोध, उपचार व जनजागृती आदी बाबींमध्ये योगदान दिले आहे. मलेरिया निर्मूलनासाठी राष्ट्रीय उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठीही दिलेल्या योगदानाची नोंद घेत त्यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने गौरवण्यात आले.

टाईम्स स्पेशल

साथीचे आजार उद्भवल्यानंतर नागरिकांमध्ये व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यासाठी ते नेहमीच अग्रस्थानी असतात. फैलावलेली साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आले आहेत. याप्रसंगी जिल्हा सिव्हील सर्जन डॉ. भास्कर जगताप, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे व आरोग्य खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg