तिलारी (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तिलारी राखीव संवर्धन क्षेत्रात ‘पिक प्लास्टिक अँड क्लीन रिव्हर’ या विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. उपवनसंरक्षक सावंतवाडी मिलिश शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी वैभव बोराटे तसेच वनक्षेत्रपाल दोडामार्ग संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
वनश्री फाउंडेशनचे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक संजय सावंत यांच्या उपस्थितीत तिलारी राखीव संवर्धन क्षेत्राच्या मुख्य कमानीपासून सुमारे दीड किलोमीटर परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी सुमारे १००० हून अधिक प्लास्टिक व काचेच्या बाटल्या तसेच अन्य प्लास्टिक कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. नदी व जंगल परिसर प्लास्टिकमुक्त ठेवण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी स्वीकारत परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला.
या मोहिमेत वनरक्षक अनिल राख (हेवाळे), सचिन पवार (त. ना. कोनाळ), शुभम वारके (बांबर्डे), छाया लोहार (त. ना. कोनाळ), श्रीमंत कदम (त. ना. कोनाळ), खोक्रल सरपंच देवा शेटकर, गौरेश राणे तसेच कॅम्प सदस्य, दोडामार्ग तालुक्यातील युवा तरुण-तरुणी आणि लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.











































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.