पनवेल :- समाजसेवा आणि मानवतेच्या कार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या शुभम सामाजिक सेवाभावी संस्था, खारघरचे संस्थापक प्रभाकर जोशी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुजाता जोशी यांचा इस्कॉन खारघर मंदिराच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. खारघर येथील इस्कॉन मंदिरात कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सर्वांगीण कल्याणासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘होलिस्टिक कॅन्सर हीलिंग रिट्रीट’ आणि ‘कृष्णा संजीवनी द डिव्हाईन म्युझिक’ या उपक्रमांतर्गत नुकताच झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल जिष्णू देव वर्मा, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, इस्कॉन नवी मुंबईचे मंदिर अध्यक्ष डॉ. सूर दास, भक्तिवेदांत कॉलेजचे संचालक डॉ. व्ही.सेवक दास, कॅल्विन सेउंगवॉन यी, जिल्हाधिकारी किशन जावळे, आयुक्त मंगेश चितळे, डॉ. विक्रम गोटा, डॉ. अमित जोशी, डॉ. रजनीश कामत, डॉ. अविनाश टिप्पणी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात जोशी दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.
प्रभाकर जोशी आणि सुजाता जोशी हे दाम्पत्य गेल्या अनेक वर्षांपासून शुभम सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करत आहे. रुग्णांना उपचार प्रक्रियेसाठी आवश्यक मार्गदर्शन, टाटा कँसर मेमोरिअल हॉस्पिटल येथे फाईल तयार करून देणे, विविध शासकीय व सामाजिक योजनांची माहिती उपलब्ध करून देणे तसेच रुग्णांच्या नातेवाईकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी मदत करणे. अशी अनेक समाजोपयोगी कामे संस्थेमार्फत केली जातात. याशिवाय ग्रामीण भागातील विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न, गरजू युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे. यामुळे संस्थेने समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
जोशी दाम्पत्याच्या या उल्लेखनीय सेवाकार्याची दखल घेत खारघर इस्कॉन मंदिराच्या विश्वस्त मंडळाने त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत समाजसेवेची ही प्रेरणादायी वाटचाल भविष्यातही अशीच सुरू राहो, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. या सन्मानामुळे शुभम सामाजिक सेवाभावी संस्थेच्या कार्याला अधिक बळ मिळणार असून समाजातील गरजू घटकांसाठी संस्था भविष्यातही अधिक जोमाने कार्यरत राहील, असा विश्वास प्रभाकर जोशी यांनी दिला.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.