loader
Breaking News
Breaking News
Foto

बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्याबद्दल पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची कारवाई

रत्नागिरी:- कोकण विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून सुरेंद्र तथा बाळ माने यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी त्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अचानक आपली उमेदवारी मागे घेतली. विशेष म्हणजे, अर्ज मागे घेताना ते सत्ताधारी महायुतीचे नेते व भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यासोबत उपस्थित होते. या अनपेक्षित माघारीमुळे महाविकास आघाडीची मोठी नाचक्की झाली आणि महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म घेऊनही ऐनवेळी विरोधकांशी हातमिळवणी करत फितुरी केल्याचा राग मनात ठेवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही तडकाफडकी कारवाई केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत ऐनवेळी नाट्यमयरीत्या उमेदवारी अर्ज मागे घेणारे सुरेंद्र तथा बाळ माने यांच्यावर शिवसेना पक्षाकडून अत्यंत मोठी आणि कडक शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या थेट आदेशाने ही कारवाई करण्यात आल्याची अधिकृत माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

बाळ माने यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप सोडून मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती मशाल घेतली होती. पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवून थेट विधान परिषदेची उमेदवारी दिली होती. मात्र, निवडणुकीच्या ऐन रणांगणात पक्षाला अंधारात ठेवून त्यांनी घेतलेल्या माघारीच्या निर्णयाला ‘पक्षद्रोह’ मानून ठाकरे यांनी त्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. या धडक कारवाईमुळे कोकणच्या आणि विशेषतः रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना उधाण आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg