loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत फुटपाथचे काम निकृष्ट दर्जाचे; मुख्याधिकारी, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ः नगरसेवक देव्या सुर्याजी

सावंतवाडी, (प्रतिनिधी) - सावंतवाडी शहरात सुरू असलेले फुटपाथचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने होत असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी केला आहे. पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या या परिसरातील कामाकडे नगरपरिषद बांधकाम विभाग आणि मुख्याधिकार्‍यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून, कंत्राटदाराने योग्य रीतीने काम न केल्यास त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नगरसेवक सुर्याजी यांनी सांगितले की, पुढील २५ वर्षे टिकेल अशा नियमाप्रमाणे हे काम होणे आवश्यक होते. मात्र, सेल्फी पॉईंटसमोरील परिसरात कॉंक्रिटीकरण न करताच आहे तसेच पेव्हर ब्लॉक बसविण्यात येत आहेत. या ढिसाळ कारभारामुळे लोकनिधीचा गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला. या कामादरम्यान ऐतिहासिक मोती तलावात संस्थानकालीन जुन्या मोर्‍यांमधून पावसाचे पाणी जाण्यासाठी असणारे सिमेंटचे पाईप कंत्राटदाराने फोडले आहेत. पावसाचे पाणी मुख्य रस्त्यावर साचू नये यासाठी पूर्वीच्या लोकांनी ही यंत्रणा केली होती. मात्र, हे पाईप फोडल्यामुळे आणि अर्धवट स्थितीत ठेवल्यामुळे पाण्याचा निचरा न होता कचरा आतमध्ये अडकण्याची भीती निर्माण झाली आहे. या मोर्‍यांवर निकृष्ट दर्जाच्या पातळ फरशा बसविण्यात येत असून, त्यावर कॉंक्रिट व पेव्हर ब्लॉकचे वजन पडल्यास या फरशा फुटून मोर्‍या तुंबण्याची शक्यता आहे. यामुळे शहरातील मोती तलाव परिसरात पावसाळ्यात पाणी साचू शकते असे सुर्याजी यांनी म्हटले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg