केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - सह्याद्री पर्वतरांगांच्या हिरव्यागार कुशीत १५ नोव्हेंबर रोजी 'सह्याद्री मॅरेथॉन स्पर्धे'चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथे स्पोर्टझीला कार्यालयात दि. ७ जून २०२६ रोजी न्या. वै. वि. आठल्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर शिपोशी'च्या माजी विद्यार्थी विचार मंचा'च्या वतीने १५ नोव्हेंबर या तारखेची घोषणा करण्यात आली.
सदर स्पर्धा हि विविध वयोगटातील धावपटूंसाठी ५ किमी, १० किमी आणि २१.०९७५ किमी (हाफ मॅरेथॉन) अशा रोमांचक अंतरांची स्पर्धा असणार आहे. मराठी शाळा, भाषा आणि पर्यावरण संकल्पना घेऊन एक पाऊल पुढे टाकण्यात येत आहे. या मॅरेथॉनद्वारे सह्याद्रीच्या सौंदर्यातून प्रेरणा घेऊन स्थानिक तरुणांना व्यायामाची सवय लावली जाईल. स्पर्धेच्या माध्यमातून आरोग्य जागृती, पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक विकासाला चालना मिळेल. सहभागी धावपटूंना आकर्षक रोख बक्षिसे, पदक, प्रमाणपत्रे आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
लवकरच २०२६ पासून ऑनलाईन नोंदणी सुरू होईल. सर्व वयोगट, लिंग आणि पार्श्वभूमीतील धावपटूंना सहभागाचे आमंत्रण असुन. शिपोशीच्या या मॅरेथॉनमुळे युवक युवती मैदानी खेळांकडे आकर्षित होऊन सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील धावण्याची परंपरा कायम राहील. यावेळी माजी विद्यार्थी विचार मंच अध्यक्ष यशवंत बाईंग, स्पोर्टझीला कंपनीचे नितीन जोशी, शाळा कट्टा ९०/९१ समूहाचे तथा माजी विद्यार्थी दत्तप्रसाद कोलते, दीपक नागवेकर, राजेंद्र दळवी, संजय शिंदे, अरविंद तरळ, प्रकाश कडू, विवेक पावस्कर आणि चंद्रकांत तरळ आदी उपस्थित होते.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.