कोकणातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख नेते आणि माजी आमदार वैभव नाईक हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रत्नागिरी येथील भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्यांच्या मालमत्तेबाबत माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय चर्चाना वेग आला आहे.
कणकवली नगरपंचायतीला पत्र पाठवून वैभव नाईक यांनी खरेदी केलेल्या मालमत्तांबाबत तपशील मागवण्यात आला आहे. विशेषतः 2002 आणि 2006 या वर्षांत त्यांनी विकत घेतलेल्या दुकान गाळ्यांची माहिती एसीबीकडून तपासली जात आहे. संबंधित गाळे एक आहेत की दोन स्वतंत्र मालमत्ता आहेत, याची खातरजमा करण्यासाठी नगरपंचायतीकडे चौकशी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैभव नाईक यांच्याबाबतची चौकशी 2022 पासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले. आपल्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न झाला तरी आपण मागे हटणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून आपली चौकशी सुरू असून इतर अनेक प्रकरणांतील चौकशा बंद झाल्या, मात्र स्वतःच्या बाबतीत तपास अद्याप सुरू असल्याने हा अन्याय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. याविरोधात आपण कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने लढा देणार असल्याचेही त्यांनी म्हटले.



































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.