सुरत : गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यात आज एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात झाला. बारडोलीच्या उवा गावाजवळ महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या MH-१८ BZ १२५८ आणि MH-२० BL-३३९० या दोन बसची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात ७ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. रस्त्यावर उलटलेल्या एका टँकरला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला असून, एक बस सीएनजीवर चालणारी असल्याने धडकेनंतर काही वेळातच तिला आग लागली. या अपघातात १७ जण जखमी झाले असून, त्यापैकी १० हून अधिक प्रवासी गंभीर आहेत. या गंभीर जखमींना सुरत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार, बारडोली-उवा महामार्गावर एक टँकर पलटी झाला होता. या पलटी झालेल्या टँकरला धडक टाळण्यासाठी पाठीमागून येणाऱ्या महाराष्ट्र पासिंगच्या एसटी बस चालकाने गाडी वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेगावर नियंत्रण न राहिल्याने बस चालकाचा ताबा सुटला. बस थेट दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर गेली आणि समोरून येणाऱ्या महाराष्ट्र पासिंगच्या दुसऱ्या एका भरधाव एसटी बसला या बसने जोरदार धडक दिली .
ही समोरासमोरची धडक इतकी भीषण होती की, दोन्ही बसेसचे मोठे नुकसान झाले. एका बसच्या समोरचा भागाचा चेंदामेंदा झाला असून, दुसरी बस रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. रस्त्यावरून खाली गेलेली बस सीएनजीवर चालणारी होती. धडक बसताच सीएनजीची गळती होऊन बसला भीषण आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. आगीच्या ज्वाळांमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला होता.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.