पनवेल :- युनिव्हर्सल ग्रुप पनवेल - रायगड तर्फे पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये रविवार दि. ७ जून २०२६ रोजी बौद्ध समाजातील इयत्ता दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व समाजप्रबोधनाचा भाग म्हणून 'आंबेडकर विरुद्ध आंबेडकर' या प्रबोधनात्मक नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' या तत्त्वावर चालणाऱ्या युनिव्हर्सल ग्रुपच्या उपक्रमाला पनवेल मधील जनतेने उदंड प्रतिसाद दिला, कार्यक्रमाचे नीटनेटके व शिस्तबद्ध नियोजन आयोजकांनी केले होते, पनवेल तालुक्यातील ९० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गौरव करण्यात आला, या कार्यक्रमाला पनवेल तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील अनेकांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाचे व आयोजकांचे कौतुक केले, उपस्थित मान्यवरांचा ग्रुपच्या वतीने मानसन्मान करण्यात आला.
'आंबेडकर विरुद्ध आंबेडकर' या नाटकाला पनवेलमधील जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. 'बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे' हे बाबासाहेबांचे विचार आणि त्यांनी लिहिलेलं संविधान यांच्या विचारावरील नाटकाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, आजचा भारतीय नेमका कसा हवा होता, आपल्याकडून त्यांच्या कोणत्या काय अपेक्षा होत्या यावर प्रभावी भाष्य करणारे एक प्रबोधनात्मक नाटक पनवेलकरांना अनुभवायला मिळालं. मागील पिढी आणि आत्ताची पिढी यामध्ये उत्साह पोटी ज्या काही चुका घडल्या असतील ते दाखवण्याचं काम मनोरंजक पद्धतीने या नाटकाच्या माध्यमातून झाले आहे आणि दोन्ही पिढीचा समतोल राखण्याचं काम हे नाटक करत आहे. नाटक पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया हीच खरी या नाटकाची पोचपावती ठरली. हे नाटकाचे आयोजन विनामूल्य करण्यात आले होते, अनेकांनी आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, जेष्ठ काशिनाथ कांबळे, अनिल भाताणकर, आर. पी. आय. चे अध्यक्ष प्रभाकर कांबळे, सुनील वाघपंजे, कमलाकर कांबळे, नरेश गायकवाड, वंचित चे आनंद गायकवाड, पोलीस पाटील कुणाल लोंढे, सचिन कांबळे, कुमार मेटांगे, नगरसेवक लतीफ शेख, युवा अध्यक्ष हेमराज म्हात्रे, सुनील कांबळे, जयदास कांबळे, निलेश सोनवणे सुभाष वाघपंजे, उद्योजक प्रवीण कांबळे, राहुल गायकवाड, कामगार नेते शरद कांबळे, संतोष गायकवाड, पोलीस अधिकारी अनिल गायकवाड, चंद्रकांत जाधव, पोलीस पाटील अर्चना बाबरे, अविनाश अडांगले आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युनिव्हर्सल ग्रुपचे राज सदावर्ते, सुधीर पवार, प्रभाकर सावंत, सुनील वानखडे, आनंदराव जाधव, अमित साळवी, संतोष गोटे, संजय फडके, विकास गायकवाड,सचिन कांबळे, नवनीत गायकवाड तसेच युनिव्हर्सल ग्रुपची सर्व टीम यांनी कठोर परिश्रम घेतले.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.