loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत कै. डॉ. प्रशांत मेहता स्मृती आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

दापोली (प्रतिनिधी) : दशानेमा गुजर युवक संस्था दापोलीच्या वतीने कै.डॉ. प्रशांत मेहता यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित केलेल्या दंतविषयक आरोग्य तपासणी शिबिराला रुग्णांचा तसेच रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दापोली येथील दशानेमा गुजर युवक संस्था, दापोली ही संस्था सामाजिक, शैक्षणिक तसेच आरोग्य जनजागृतीच्या क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम राबवत असून युवकांना समाजकार्यात सक्रिय सहभागासाठी प्रेरित करण्याचे कार्य करत आहे. याच अनुषंगाने संस्थेच्या वतीने कै. डॉ. प्रशांत किसन मेहता यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गतवर्षीप्रमाणे यावर्षीही कै. डॉ. प्रशांत किसन मेहता स्मृती महारक्तदान शिबिर तसेच मोफत दंतचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अशा या समाजोपयोगी उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे दशानेमा गुजर युवक संस्था, दापोलीचा मुळ उद्देश चांगलाच सफल झाला. संस्थेने डॉ. प्रशांत किसन मेहता यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल १४४ रक्तदात्यांनी रक्तदान करुन आपला सामाजिक सहभाग नोंदवला तर दंतचिकित्सा शिबिरात ५५ रुग्णांनी आपल्या दातांची तपासणी करून घेतली. सामाजिक बांधिलकीच्या या आरोग्यविषयक उपक्रमासाठी दशानेमा गुजर युवक संस्था, दापोलीने तज्ञ वैद्यकीय अधिकार्‍यांची टिम उपलब्ध करत समाजाप्रती बांधिलकी जोपासण्याचे महत्वाचे काम केले आणि कै.डॉ. प्रशांत किसन मेहता यांच्या सामाजिक कामाला त्यांच्या स्मृती दिनानिमित्त उजाळा देत त्यांच्या सामाजिक कामाच्या आठवणी जागवण्याची महत्वपूर्ण कामगिरी पार पाडली.

टाईम्स स्पेशल

अशा या दापोली शहरातील सुप्रसिद्ध राधाकृष्ण मंदिर सभागृहात आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमासाठी दशानेमा गुजर युवक संस्था, दापोलीचे अध्यक्ष आणि कै.डॉ. प्रशांत मेहता यांचे सुपुत्र डॉ. कुणाल मेहता यांच्यासह उपाध्यक्ष निकेत मेहता, सचिव मयुरेश शेठ, प्रकल्प संचालक ऋषिकेश तलाठी यांच्यासोबतीने दशानेमा गुजर युवक संस्था दापोलीच्या सभासदांनी आरोग्यविषयक शिबिरात आलेल्यांची आस्थेने चौकशी करत त्यांना उचित मान देत त्यांची तपासणी केली. अशा या आपुलकीच्या सेवेमुळे येथे आलेल्यांना परके वाटले नाही. तसेच रक्तदात्यांचासुध्दा मान राखत त्यांना सामाजिक उपक्रमात सहभागी करून घेतले. अशा कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती राहून आयोजकांच्या सामाजिक उपक्रमाचे समाधान व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg