loader
Breaking News
Breaking News
Foto

उत्कृष्ट चालक म्हणून मिलिंद शिंदे यांचा गौरव

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - देवरुख आगारातील चालक मिलिंद शिंदे यांचा उत्कृष्ट सेवा, प्रवाशांशी सौजन्यपूर्ण वर्तन तसेच प्रामाणिकपणे कर्तव्य बजावल्याबद्दल एस.टी. महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. मिलिंद शिंदे यांनी आपल्या सेवाकाळात सुरक्षित आणि जबाबदारीने वाहन चालवून प्रवाशांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महामंडळाने त्यांचा गौरव केला. मिलिंद शिंदे हे तालुक्यातील फणसवणे गावचे रहिवाशी असुन ते एक उत्तम निवेदक, क्रिकेट पट्टू, आणि उत्कृष्ट पकवाज वादक असुन पंचक्रोशीत समlलोचक म्हणुन त्यांची वेगळी ओळख आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यापूर्वीही २६ जानेवारी रोजी सेवेतील दहा वर्ष विनाअपघात सेवा बजावल्याबद्दल त्यांना उत्कृष्ट चालक म्हणून सन्मानित करण्यात आले होते. हा गौरव सोहळा देवरुख आगरात तुषार कोळी..( वाहतूक निरीक्षक.. स्थानक प्रमुख ) यांच्या हस्ते शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सन्मानितसंपन्न झाला. त्या वेळी दिलीप वासुदेव शिंदे (सहाय्यक वाहतूक निरीक्षक), प्रकाश सावंत (वाहतूक निरीक्षक), संतोष जाधव (सहाय्यक वाहतूक निरीक्षक), सुरेंद्र रहाटे (वाहतूक निरीक्षक) आणि मिथून शिंदे (वाहतूक निरीक्षक) उपस्थित होते. या सन्मानाबद्दल देवरुख आगारातील अधिकारी, कर्मचारी तसेच प्रवाशांकडून मिलिंद शिंदे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg