loader
Breaking News
Breaking News
Foto

रायगड–रत्नागिरी–सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक सहाही उमेदवारांची 12 नामनिर्देशन पत्रे वैध

रत्नागिरी : महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज संस्थेची द्विवार्षिक निवडणूक 2026 रायगड तथा रत्नागिरी तथा सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघासाठी एकूण दाखल सहाही उमेदवारांची 12 नामनिर्देशन पत्रे आज झालेल्या छाननीत वैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. नामनिर्देशन पत्रे माघे घेण्याचा अंतिम दिनांक गुरुवार 4 जून हा आहे. जुईली महेंद्र दळवी (अपक्ष) यांनी 30 मे रोजी 1 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या काल शेवटच्या दिवशी सुरेंद्रनाथ यशवंत माने (शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांनी 4, अरविंद पुंडलिक म्हात्रे (पींझट्स ॲण्‍ड वर्कस् पार्टी ऑफ इंडिया) 1, मानसी संतोष म्हात्रे (पींझट्स ॲण्‍ड वर्कस् पार्टी ऑफ इंडिया) 1, अनिल रमेश चोपडा (अपक्ष) 1 आणि अनिकेत सुनिल तटकरे (नॅशलिस्ट काँग्रेस पार्टी) 4 अशी एकूण 6 उमेदवारांची 12 नामनिर्देशन पत्र दाखल झाली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आज सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात निवडणूक निरीक्षक अभय महाजन यांच्या उपस्थितीत सर्व दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी झाली. यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी जिंदल यांनी सर्व नामनिर्देशन पत्रांबाबत माहिती देऊन कोणाला आक्षेप असल्यास नोंदविण्याची संधी देखील दिली. या छाननीत ही सर्व नामनिर्देशन पत्रे वैध ठरली. मानसी संतोष म्हात्रे यांचे नामनिर्देशन पत्र हे अपक्ष म्हणून आज झालेल्या छाननीत ठरविण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg