नवीदिल्ली : देशातील एटीएममध्ये यावेळी रोख रक्कमेचा तुटवडा जाणवत आहे, अशी माहिती कॉन्फडेरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीने इंडियन बँक असोसिएशनला दिली आहे. त्यामुळे देशातील एटीएमवरच नाही तर नागरिकांवर नवीन संकट आले आहे. रोख रक्कमेच्या तुटवड्यामुळे अनेक एटीएमची सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. बिझनेस स्टँडर्डच्या एका वृत्तानुसार, पूर्वीच्या तुलनेत एटीएमचे व्यवहार कमी झाले आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी ऐन पेरणीच्यावेळी रोख रक्कम मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. ही अडचण दूर करण्याची मागणी करण्यात येत आहे.
आकड्यांनुसार, सर्व एटीएममध्ये रोख रक्कमेचा तुटवडा जाणवला होता. मार्च आणि एप्रिल महिन्यात एकूण 94,000 कोटी रुपयांची आवश्यकता होती. पण मार्च महिन्यात केवळ 61,000 कोटी रुपये आणि एप्रिल महिन्यात केवळ 54,000 कोटी रुपये उपलब्ध होऊ शकले. त्यामुळे ही मोठी तफावत समोर आली होती. तर मे महिन्यातही ग्रामीण भागातील एटीएममध्ये नोटांचा तुटवडा जाणवला. राज्यातील काही जिल्ह्यात याविषयीची ओरड करण्यात आली होती. तर मराठवाड्यातील एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा गायब झाल्याचा आरोप आमदार अंबादास दानवे यांनी केला होता. अनेक एटीएमवर जात शिवसैनिकांनी 500 रुपयांच्या नोटा येत नसल्याचे डेमो दाखवले होते. तर याप्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.



































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.