loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रवादी-शिवसेना पक्ष फुटला नाही फोडला गेला, पक्ष फोडण्यासाठी केंद्रिय यंत्रणांचा वापर - सुप्रिया सुळे

नवी दिल्ली - खासदार सुप्रिया सुळे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीत पोहोचल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी-शिवसेना पक्ष फुटला नाही फोडला गेला, पक्ष फोडण्यासाठी केंद्रिय यंत्रणांचा वापर झाला असा थेट आरोप केला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रीय यंत्रणांचा वापर विरोधी पक्षांवर दबाव आणण्यासाठी केला जात आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत जे घडले, त्याच पद्धतीने आता पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसलाही लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकशाहीत विरोधी पक्षांना कमकुवत करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्या म्हणाल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, इंडिया आघाडीच्या आज होत असलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीबाबत माहिती देताना सुप्रिया सुळे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ऑनलाइन माध्यमातून बैठकीत सहभागी होणार असल्याचे सांगितले. विरोधी पक्षांमध्ये समन्वय वाढवणे, आगामी निवडणुकांसाठी रणनीती निश्चित करणे आणि देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करणे, हा या बैठकीचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र असून विरोधकांची एकजूट अधिक मजबूत करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg