loader
Breaking News
Breaking News
Foto

आय.सी.एस. महाविद्यालयाचा बी.कॉम. अंतिम वर्षाचा निकाल 76.86 टक्के

खेड : येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बी.कॉम. सेमिस्टर-VI (CBCS) एप्रिल 2026 परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून महाविद्यालयाचा निकाल 76.86 टक्के लागला आहे. निकालामध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले असून सिद्दीक झैनब गुलाम हुसेन फिरदोस हिने 9.68 CGPI मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. हमदुले नुसेबा हिशामुद्दीन अलिया हिने 9.62 CGPI सह द्वितीय क्रमांक मिळविला, तर जुईकर उमेरा मुख्तार सबिहा हिने 9.49 CGPI मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याशिवाय चिस्ती सरीना इफ्तिखार नगिना (9.38 CGPI), तिसेकर इंश्रा यासीन नईमा (9.25 CGPI) आणि तिसेकर समिया यासीन नईमा (9.13 CGPI) यांनीही उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत स्थान मिळविले आहे. या यशाबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला, महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲड. आनंदराव भोसले, प्राचार्या प्रो.डॉ. अनिता आवटी, प्राध्यापकवर्ग, पालक आणि विद्यार्थ्यांकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg