पनवेल :- पनवेल बस स्थानक परिसरात महाराजा स्वीटस कॉर्नरसमोर उड्डाणपूलाखाली रात्रीच्या वेळी नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर चहाच्या टपऱ्या आणि दुकाने रात्रभर सुरू राहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या टपऱ्यांवर प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि सिगारेटची राजरोसपणे मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात असल्याची माहिती माध्यमांमधून जाहीर झाल्यानंतर रायगड झोन 1 मध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाने 10 जून 2026 च्या मध्यरात्री पनवेल एस. टी. डेपो इथे एक मोठी गुप्त कारवाई केली आहे. पनवेल एस. टी. डेपो परिसरात टाकलेल्या छाप्यात प्रतिबंधित अन्नपदार्थांची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत हजारो रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून वाहतुकीसाठी वापरले जाणारे वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी पनवेल एस. टी. डेपो रोडवर वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून खालील व्यक्तींवर कारवाई केली: त्यामध्ये चार जणांवर कारवाई करत फुटपाथवर तात्पुरते टेबल लावून व्यवसाय करणे, मारुती वॅगेनार गाडीद्वारे विक्री करणे अशांवर कारवाई करून त्यांच्याविरोधात मानवी आरोग्याला घातक ठरणाऱ्या प्रतिबंधित खाद्यपदार्थांची छुप्या पद्धतीने साठवणूक आणि विक्री केल्याप्रकरणी कारवाई करून त्यांच्याकडून 4, 257.5/- किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये गाडी सुद्धा जप्त करण्यात आली आहे. याबाबत त्यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
सदर यशस्वी कामगिरी अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (अन्न) पी. एस. नलावडे आणि सहाय्यक आयुक्त (अन्न) एन. डी. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रत्यक्ष छाप्यात अन्न सुरक्षा अधिकारी व्ही. एस. निकम यांच्यासह आर. बी. लोकारे, व्ही. एन. इघारे, पी. डी. माने, आणि पी. एम. शिंदे यांनी सहभाग घेतला. या कारवाईमुळे पनवेलमधील बेकायदेशीर खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.