loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यातून रवींद्र फाटक प्रचंड मताधिक्याने विजयी होतील , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला ठाम विश्वास

ठाणे, ता. १ : विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार माधवी नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रमोद हिंदुराव,आमदार कुमार आयलानी आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के तसेच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी रिपाइंचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

या प्रतिसादामुळे रवींद्र फाटक यांचा विजय निश्चित असून ते प्रचंड मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, संबंधित मतदारसंघांमध्ये महायुतीचे प्राबल्य असून बहुमतही महायुतीकडे आहे. त्यामुळे ही निवडणूक महायुती मोठ्या मताधिक्याने जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg