वेळणेश्वर (उमेश शिंदे) - रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे डोर्लेकरवाडीची कन्या तथा महाराष्ट्र शासनाच्या अग्निशमन दलात कार्यरत असलेली धाडसी वीरकन्या स्नेहल प्रभाकर आडविरकर हिने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. तिला Rotary Club of Deonar Blue Ribbon Awards 2026 अंतर्गत "Best Women Fire Fighter" हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
अग्निशमन दलासारख्या आव्हानात्मक आणि धोकादायक क्षेत्रात कार्य करताना स्नेहल आडविरकर यांनी दाखविलेली शौर्यपूर्ण कामगिरी, कर्तव्यनिष्ठा आणि जनसेवेची भावना याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला. संकटाच्या प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी धावून जाणाऱ्या स्नेहल यांनी महिला शक्तीचे प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर उभे केले आहे. डोर्लेकरवाडीसह संपूर्ण परिसरासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण असून, त्यांच्या या यशामुळे अनेक तरुणींना नवीन प्रेरणा मिळणार आहे. स्नेहल यांच्या यशामागे त्यांची जिद्द, कठोर परिश्रम आणि त्यांच्या पालकांचे मोलाचे मार्गदर्शन व पाठबळ असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्नेहल प्रभाकर आडविरकर यांचे तसेच त्यांच्या पालकांचे विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यातही अशाच प्रकारे समाजसेवा आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर त्या आणखी मोठी यशस्वी भरारी घेतील, असा विश्वास सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. स्नेहल आडविरकर यांच्या या गौरवशाली यशाबद्दल सर्वत्र त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.



































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.