loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्येष्ठ नेते कमलनाथ यांना डावलून काँग्रेसने मीनाक्षी नटराजन यांना विधान परिषदेसाठी संधी का दिली असेल ?

मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांना डावलून नव्या चेहऱ्याला संधी काँग्रेसने दिली आहे, विधान परिषदेसाठी मीनाक्षी नटराजन यांना काँग्रेस पक्षाने संधी दिली आहे. त्या आहेत कोण? त्यांचे कर्तृत्व काय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय, तर त्या अगदी सामान्य कुटुंबातील असून त्यांची जीवनशैली अगदी खाण्यापिण्याच्या सवयीपर्यंत त्या पूर्ण गांधीवादी आहेत. त्यांचे साधे जीवन आणि उच्च विचार पाहूनच काँग्रेसने त्यांना विधान परिषदेसाठी उमेदवार म्हणून संधी दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्या एक अत्यंत प्रामाणिक आणि गांधीवादी नेत्या आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी काँग्रेसने त्यांना अंदाजे ५ कोटी रुपये दिले (ज्यांना काँग्रेसची माहिती आहे, त्यांना माहीत आहे की निवडणुकीसाठी पैसे हे प्रतिष्ठेनुसार दिले जातात). निवडणुकांनंतर, त्यांनी ४ कोटींहून अधिक रुपये पक्षाच्या निधीत परत जमा केले. त्याचप्रमाणे, विधानसभा निवडणुकीतही त्यांनी आपल्या पैशांपैकी अंदाजे ७५% रक्कम पक्षाच्या निधीत परत जमा केली, असे सांगितले जात आहे.

टाइम्स स्पेशल

भारतामध्ये असे दर्जेदार सामाजिक कार्यकर्ते शोधून त्यांची निवड काँग्रेस पक्ष करू लागली आहे. काँग्रेस पक्षाला शुद्ध चारित्र्याची माणसे राजकारणात आणायचे आहे त्याचेच हे उदाहरण म्हटले जातेय. भारतात अशा प्रकारे 50 ते 60 सामाजिक कार्यकर्त्यांची निवड यावेळी विधानपरिषद उमेदवार म्हणून काँग्रेसने केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg