संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापरासोबतच सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचे चित्र असून, संगमेश्वर तालुक्यात अशाच एका प्रकारात किराणा व्यापारी आणि त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून तब्बल २ लाख १४ हजार १४८ रुपयांची रक्कम ऑनलाइन पद्धतीने परस्पर काढून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तौफिक जिकर मेमन (वय ३९, रा. नावडी, ता. संगमेश्वर) यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. तक्रारीनुसार, ३० मे रोजी सायंकाळी ६.२७ ते ७.१२ या कालावधीत अज्ञात सायबर भामट्याने त्यांच्या बँक ऑफ इंडिया संगमेश्वर शाखेतील खात्यातून ८९ हजार १४९ रुपये ऑनलाइन पद्धतीने काढून घेतले. याचवेळी त्यांच्या पत्नी फौजिया तौफिक मेमन यांच्या बँक खात्यातूनही १ लाख २४ हजार ९९९ रुपये परस्पर वळते करण्यात आले. अशा प्रकारे दोन्ही खात्यांमधून एकूण २ लाख १४ हजार १४८ रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पीडितांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा आणि फसवणुकीच्या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, व्यवहारांचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे. संबंधित रक्कम कोणत्या खात्यात वर्ग करण्यात आली, तसेच फसवणुकीसाठी कोणती पद्धत वापरण्यात आली याचा शोध घेतला जात आहे.











































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.