loader
Breaking News
Breaking News
Foto

वयाच्या १३ व्या वर्षी पखवाज विशारद; सावंतवाडीच्या गार्गी सावंतची उल्लेखनीय कामगिरी

सावंतवाडी - कोलगाव येथील कु. गार्गी किरण सावंत हिने वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी पखवाज वादन क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ यांच्या ’वारकरी संगीत विशारद पखवाज’ परीक्षेत तिने यश मिळवत पदवी प्राप्त केली आहे. सावंतवाडीच्या कु. गार्गी सावंत हिने अगदी लहान वयात पखवाज विशारद होत नवा आदर्श निर्माण केला आहे. गार्गी ही कोलगाव भोम येथील माजी सैनिक तथा जिल्हा परिषद सिंधुदुर्ग बांधकाम विभागाच्या वेंगुर्ला शाखा कार्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले किरण रामचंद्र सावंत यांची कन्या आहे. ती सावंतवाडी येथील शांतीनिकेतन इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिक्षण घेत आहे. पुरुषप्रधान मानल्या जाणार्‍या पखवाज वादन क्षेत्रात गार्गीने आपल्या जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. तिच्या यशामागे पखवाज अलंकार गुरु महेश विठ्ठल सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गार्गीची संगीत क्षेत्रातील वाटचाल यापूर्वीही उल्लेखनीय राहिली आहे. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी तिने भारतीय संगीत कलापीठ, छत्रपती संभाजीनगर येथील विशारद पदवी संपादन केली होती. त्यानंतर अधिक मेहनत घेत तिने १३ व्या वर्षी ’पखवाज विशारद’ ही मानाची पदवीही प्राप्त केली. शालेय शिक्षणासोबतच पखवाजसारख्या पारंपरिक वाद्यावर प्रभुत्व मिळवणार्‍या गार्गीच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तिचे गुरु महेश सावंत तसेच सावंत कुटुंबाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. गार्गीची ही कामगिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद मानली जात असून ती इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg