खेड (प्रतिनिधी )- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका कॉंग्रेसने विविध स्थानिक आणि राष्ट्रीय प्रश्नांवर सरकार व प्रशासनाला धारेवर धरत पत्रकार परिषद घेतली आहे. नीट आणि सीबीएसईसह विविध परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांच्या मृत्यूस जबाबदार असणार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कॉंग्रेसने केली आहे. तसेच खेड शहरातील रस्ते आणि गटारांच्या कामांबाबतही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
खेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत तालुका कॉंग्रेसचे प्रभारी अध्यक्ष फैसल देसाई यांनी राष्ट्रीय परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. नीट, सीबीएसई आणि इतर परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणांमुळे मानसिक तणावाखाली येऊन जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी खेड शहरातील रस्ते आणि गटारांच्या सुरू असलेल्या कामांवरही कॉंग्रेसने टीका केली. नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला. पावसाळा तोंडावर असताना सुरू असलेल्या कामांच्या दर्जाबाबतही कॉंग्रेसने शंका व्यक्त केली.
स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना भाजप आमदार प्रमोद जठार यांनी शासकीय विश्रामगृहात पक्षाचा कार्यक्रम घेऊन आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप कॉंग्रेसने केला. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे पुराव्यांसह तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. दरम्यान, वारंवार खंडित होणार्या वीजपुरवठ्याबाबतही कॉंग्रेसने महावितरणच्या अधिकार्यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली. अवेळी होणारे वीज खंडितीकरण तातडीने थांबवावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने दिला आहे. फैसल देसाई, प्रभारी तालुकाध्यक्ष, कॉंग्रेस या पत्रकार परिषदेला प्रफुल्ल शेवरकर, नाझीमा तांबे, सीमा शिंदे, मुराद लाडघरकर, राबिया जासनाईक, शहराध्यक्ष मंगेश भैरवकर आणि नासर जसनाईक यांच्यासह कॉंग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. खेड तालुका कॉंग्रेसने उपस्थित केलेल्या या प्रश्नांवर प्रशासन आणि संबंधित यंत्रणा काय भूमिका घेतात, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.



































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.