दोडामार्ग (प्रतिनिधी) - तीन दिवसांपूर्वी तिलारी घाटात प्रेशर पॉईट रस्ता येथे महिलेचा घातपात करून मृतदेह टाकलेला आढळून आला होता. या महिलेचा चेहरा सडलेला होता यामुळे ओळख पटवणे कठीण झाले आहे. तेव्हा पोलिसांनी महिलेची ओळख पटवण्यासाठी तिच्या अंगावर आढळून आलेले दागिने सार्वजनिक करून या दागिन्यावरून महिलेचे नातेवाईक यांनी संपर्क साधून ओळख पटवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन चंदगड पोलिसांकडून करण्यात आले आहे.
कळसगादे (ता. चंदगड) या गावच्या हद्दीतील तिलारी घाटात प्रेशर पॉईंट येथे रस्त्याच्या बाजूला जंगलातील झुडूपात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या महिलेच्या चेहरा सडलेल्या स्थितीत असून स्पष्ट दिसत नसल्याने तिच्या अंगावरील दागिन्यावरून महिलेची ओळख सापडली किंवा तशा दागिन्याबाबत अधिक माहिती समजल्यास चंदगड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन चंदगडचे पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांनी केले आहे.
सदर महिला ३० ते ३५ वयोगटातील असून चेहरा सडलेल्या स्थितीत असल्याने सहज ओळख लागणे अशक्य झाले आहे. तिच्या अंगावर डिझाईन असलेली साडी व सोनेरी रंगाचा ब्लाऊज आहे. पायात चांदीची जोडवी, पैंजण व कानात सोनेरी झुबे आहेत. सदर दागिन्यांचे छायाचित्र पोलिसांनी सार्वजनिकरित्या जाहीर केले आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता ही घटना निदर्शनास आली आहे.



































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.