loader
Breaking News
Breaking News
Foto

बांद्यात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच दिवशी दोन पल्सर दुचाकी लंपास

बांदा (प्रतिनिधी) - बांदा शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, एकाच दिवसात दोन बजाज पल्सर दुचाकी चोरल्या गेल्या. मंगळवारी उभी करून ठेवलेली एक दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बांदा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राजा शहा (वय २६, रा. निमजगा, ता. सावंतवाडी) हे सेंट्रिंग व्यवसाय करतात. त्यांनी त्यांची बजाज पल्सर 160 (क्र. एमएच-07-एएन-9448) ही दुचाकी मंगळवारी बांदा कट्टा येथील महामार्गाखालील परिसरात उभी करून कामासाठी गेले होते. बुधवारी सकाळी सुमारे १२ वाजण्याच्या दरम्यान दुचाकी घेण्यासाठी ते परत आले असता संबंधित ठिकाणी गाडी आढळून आली नाही.

टाईम्स स्पेशल

यानंतर त्यांनी परिसरात शोध घेतला. मात्र दुचाकीचा कोणताही मागमूस लागला नाही. अखेर अज्ञात चोरट्याविरोधात बांदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अर्चना धरणे करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg