loader
Breaking News
Breaking News
Foto

टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये गावदेवी जानवळे संघ विजेता

वरवेली (गणेश किर्वे) - टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी यांच्या वतीने १९ वर्षाखालील मुला मुलींची जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा गोल्डन पार्क, शृंगारतळी ता.गुहागर येथे सचिव अंतरराष्ट्रीय खेळाडू डॉ.योगिता खाडे/आयरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. जिल्ह्यातील सुमारे १४० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. निवड समिती प्रमुख डॉ. विजय तांदळेकर यांनी काम पाहिले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक, गावदेवी जानवळे संघ यांना १० हजार रुपये रोख रक्कम, पारितोषिक, द्वितीय क्रमांक.मारूती छाया वेळंब संघ यांना ५ हजार रुपये रोख रक्कम,पारितोषिक तसेच उत्कृष्ट फलंदाज सुजल शिरगावकर, जानवळे (गुहागर) व उत्कृष्ट गोलंदाज अथर्व कदम, रानवी (गुहागर) यांना गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी, तालुका उपाध्यक्ष ओंकार संसारे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेमधील गुणवान व उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडूं ४ ते ६ जून २०२६ रोजी लातूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा संघटनेच्या सचिव अंतरराष्ट्रीय खेळाडू डॉ.योगिता खाडे (आयरे) प्रणीत सावंत, शशिकांत उदेग, मंदार साळवी, राहुल जामसूतकर, अंतरराष्ट्रीय खेळाडू हुजैफ़ा ठाकुर, संदेश चव्हाण, तसेच पंच म्हणुन स्वप्निल धामणस्कर, कैलास पिळनकर समालोचक चेतन गुरव यांनी सहकार्य केले. जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर उपाध्यक्ष मंगेश माटे, खालील भाई दलवाई, सचिव डॉ. योगिता खाडे आयरे, तालुकाध्यक्ष ॲड.संकेत साळवी, उपाध्यक्ष ओंकार संसारे, उद्योजक सुदीप संसारे यांनी शुभेच्छा देवून अभिनंदन केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg