loader
Breaking News
Breaking News
Foto

खान, फाटक.. आदी,.विधान परिषदेसाठी, शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर; एकनाथ शिंदेंची मोठी आघाडी

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठीअखेर महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित झाले आहे. प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे-प्रतिदाव्यानंतर 17 जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. शिदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला ठाण्यासह नाशिक, परभणी आणि यवतमाळ विधान परिषदेची जागा आली आहे. या चार जागेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची नावंही समोर आली आहेत. ठाण्यासह नाशिक, परभणी आणि यवतमाळ विधान परिषदेची जागा आली आहे. ठाण्यातून रवींद्र फाटक, नाशिकमधून नरेंद्र दराडे, परभणी-हिंगोलीमधून सईद खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर यवतमाळच्या जागेसाठी 3 उमेदवार शर्यतीत आहेत. यामध्ये दुष्यंन्त चतुर्वेदी, किरण पांडव,सलीम खातून यांचा समावेश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अल्पसंख्यांक समाजातील युवा चेहरा सईद खान यांना उमेदवारी देत राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू केली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निकटवर्तीयांपैकी समजले जाणारे सईद खान हे सध्या शिवसेनेच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे मराठवाड्यातील अल्पसंख्यांक समाजाला थेट प्रतिनिधित्व देण्याचा संदेश महायुतीकडून देण्यात आल्याचे मानले जात आहे.ठाणे- रवींद्र फाटक , नाशिक- नरेंद्र दराडे, परभणी-हिंगोली- सईद खान, यवतमाळ- दुष्यंन्त चतुर्वेदी, किरण पांडव,सलीम खातून (संभाव्य)

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg