loader
Breaking News
Breaking News
Foto

'योगायोग मित्र मंडळ हातखंबा' आयोजित ५ दिवसीय मेहंदी प्रशिक्षण शिबिराची दिमाखदार सांगता!

रत्नागिरी (प्रतिनिधी) : 35 वर्षांच्या सामाजिक कार्याच्या चळवळीत ग्रामीण भागातील महिला व युवतींना केवळ चूल आणि मूल यापुरते मर्यादित न ठेवता, त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हाच मुख्य उद्देश डोळ्यांसमोर ठेवून 'योगायोग मित्रमंडळ, हातखंबा' च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५ दिवसीय 'व्यावसायिक मेहंदी प्रशिक्षण शिबिराची' रविवारी, ७ जून रोजी अत्यंत उत्साहात सांगता झाली. बाजारात हजारो रुपये फी असलेल्या या कोर्सचे प्रशिक्षण मंडळाने अवघ्या ५० रुपयांच्या नाममात्र शुल्कात उपलब्ध करून दिल्यामुळे हातखंबा पंचक्रोशीतीलच नव्हे तर कशेळी, दाभोळे येथील तब्बल ६७ महिला व युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घेतला. ३ जून रोजी या शिबिराचा उद्घाटन सोहळा शीतल शिंदे (शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया, हातखंबा) यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने संपन्न झाला होता. या संपूर्ण ५ दिवसीय उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष योगेश मेस्त्री होते. व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्या रत्नप्रभा देसाई, माजी ग्रा.पं. सदस्या ऐश्वर्याताई देसाई, शिबिरातील टी-ब्रेकचे प्रायोजक 'सोसायटी टी'चे मंगेश मसूरकर व आठवले, तसेच मंडळाच्या ज्येष्ठ सदस्या संपदाताई देवळेकर उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवातील सुवर्णपदक विजेत्या मुख्य प्रशिक्षिका अनुष्का प्रशांत महाजन यांनी अत्यंत सोप्या पद्धतीत महिलांना मेहंदी व्यवसायाचे सर्व तांत्रिक बारकावे शिकवले. प्रशिक्षणादरम्यान लागणारे सर्व साहित्य मंडळाच्या वतीने मोफत पुरवले गेले. शिबिराच्या शेवटच्या दिवशी प्रशिक्षणार्थी महिलांची अटीतटीची 'मेहंदी स्पर्धा' आयोजित करण्यात आली होती. यामध्ये महिलांनी एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स रेखाटून सर्वांचे डोळे दिपवले. मेहंदी स्पर्धेमध्ये शमिका राजेश झगडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर मनाली नारायण केसरेकर - द्वितीय, मैत्री महेंद्र कांबळे - तृतीय व केतकी लक्ष्मीकांत केतकर यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. मुख्य प्रशिक्षिका अनुष्का महाजन यांनी सर्व प्रशिक्षणार्थींच्या कलेचे कौतुक करत शिबिराबद्दल अत्यंत सकारात्मक आणि गौरवोद्गार काढले.

टाईम्स स्पेशल

रविवारच्या सांगता समारंभाला मुख्य अतिथी म्हणून हेडकॉन्स्टेब सानिया कांबळे उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थित महिला व युवतींना 'महिला सुरक्षितता, सायबर सुरक्षा आणि कायदे' या विषयावर अत्यंत प्रभावी व कणखर व्याख्यान दिले, ज्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. स्पर्धा विजेत्यांना मंडळातर्फे सन्मान चिन्ह व सन्मानपत्र आणि सर्व सहभागींना 'सहभाग सन्मानपत्र' देऊन गौरविण्यात आले. ​पहिल्या दिवसाच्या उत्साहापासून ते शेवटच्या दिवसाच्या समारोपापर्यंत मिळालेल्या या अभूतपूर्व प्रतिसादामुळे 'योगायोग मित्रमंडळा'च्या या महिला सक्षमीकरणाच्या खंबीर पावलाचे रत्नागिरी तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg