loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली भेडशीत मोरी कामामुळे चिखल; वाहनधारकांची गैरसोय, नागरिक नाराज

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग ते साटेली भेडशी दरम्यान रस्ता काम करताना संबंधित काम करणार्‍या ठेकेदार यांनी उसप तिठा साटेली भेडशी येथे मुख्य रस्त्यावर पाऊस सुरू झाला असताना मोरी बांधकाम हाती घेतले. पण वाहतूक व्यवस्थेबाबत ठोस उपाययोजना न करता केवळ मातीचा भराव टाकून दोन्ही बाजूंनी रस्ता धोकादायक करून ठेवला आहे. झालेला चिखलामुळे काही गाडया अडकून पडल्या. यामुळे ग्रामस्थांतून नाराजीचे सूर उमटले. ठेकेदाराच्या निष्काळजीपणाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या ठिकाणी खडी, सिमेंट काँक्रिट टाकून वाहतूक व्यवस्था सुरळीत करा, या लोकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहेे. ठेकेदाराने करतो असे सांगून ग्रामस्थांची दिशाभूल केली. पावसाळ्यात धोका निर्माण करणार्‍या संबंधित ठेकेदारास तहसिलदार यांनी योग्य सूचना कराव्या, अशी मागणी केली जात आहे. साटेली भेडशी उसप तिठा पांडुरंग नाईक यांच्या दुकानाजवळ मोरी बांधकाम करायला पाहिजे याची जाणीव संबंधित ठेकेदार याना होती. पण काम सुरू होऊन सहा महिने झाले या कालावधीत मोरी बांधकाम हाती घेतले नाही आणि आता पाऊस सुरू झाला तेव्हा रस्ता मोरी खोदून धोका निर्माण करून केल्याचे बोलले जात आहे.

टाईम्स स्पेशल

माती भराव टाकून रस्ता चिखलमय झाला आहे. यामुळे दोन्ही बाजूंनी एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली असून वाहने पलटी होण्याची शक्यता ही बळावली आहे. सदर मोरी बांधकाम योग्य नसल्याचे काही सांगण्यात येत आहे. रस्ता खोदून पाईप टाकले पण त्याखाली खडी सिमेंट काँक्रिट काही टाकले नाही. लोकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. दोडामार्ग ते साटेली भेडशी आवाडा दरम्यान काही ठिकाणी धोका निर्माण झाला आहे. मोर्‍या बांधकाम केले पण पाणी जाण्यासाठी गटार उघडे केले नाही, यामुळे पाणी रस्त्यावर येत आहे. पण लोकप्रतिनिधी या गंभीर समस्येकडे लक्ष देत नाही, त्यामुळे ठेकेदाराच्या या कारभारावर ग्रामस्थ तसेच येथून प्रवास करणारे वाहनधारक चांगलेच संतापले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg