loader
Breaking News
Breaking News
Foto

आसुद येथील पशुवैद्यकीय दवाखाना बंद, पशुपालकांना पशुधनाच्या उपचाराची चिंता

दापोली (प्रतिनिधी) - आसुद येथील गुरांचा दवाखाना बंद असल्यामुळे पशुपालकांना आपल्या आजारी पडलेल्या पाळीव प्राण्यांवर खाजगी पशुवैद्यांकडून आर्थिकदृष्ट्या खिशाला न परवडणारे महागडे उपचार करून घ्यावे लागत आहे. त्यामुळे गतिमान प्रशासनाचे हेच का ते सजग प्रशासन असे आसुद परिसरातील पशुपालक खुलेआम बोलू लागले आहेत. राज्याच्या शेती विकासात जनावरांना महत्त्वाचे स्थान आहे. शेतक-यांना पर्यायी रोजगार -स्वयंरोजगार सुरू करता येतो. त्यातून त्यांना उत्पन्नाचा आणखी एक स्त्रोत उपलब्ध होतो. त्यामुळे राज्य शासन पशुसंवर्धन, दुग्धविकास, कुक्कुटपालन, मस्यव्यवसाय, यावर लक्ष केंद्रित करत असते. त्यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येतात. पशुधनाचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी प्रत्येक तालुक्यात मध्यवर्ती ठिकाणी साधारणपणे कमीत कमी 7 ते 8 गावांसाठी मिळून एका पशुवैद्यकीय दवाखान्यांची निर्मिती करण्यात येते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुक्यातील आसुद येथे 9 गावांसाठी एका पशु वैद्यकीय दवाखान्याची निर्मिती करण्यात आली आहे. शासनाने पशुवैद्यकीय दवाखाना बांधावा म्हणून इमारतीसाठी मोठ्या मनाने आसुद ग्रामस्थांनी विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली आहे. अशा या दवाखान्यात सध्या एकही अधिकारी व कर्मचारी कार्यरत नसल्याने आसुद परिसरातील 9 गावांमधील पाळीव जनावरांच्या निरोगी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दापोली तालुक्यातील आसुद गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात एक पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यासह त्यांचे सहकारी असे पद मंजूर आहे. मात्र या दवाखान्यात अधिकारी तसेच परिचारक उपस्थित राहत नसल्याने हा दवाखाना बंद असतो. आसुद परिसरातील अनेक शेतकरी शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्ध उत्पादनाचा व्यवसाय करतात. मात्र त्यांना वेळीच त्यांच्या जनावरांना आरोग्य सेवा मिळत नसल्याने पशुसंवर्धन खात्याच्या या अनागोंदी कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात असून पशुधन बाळगणाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

टाईम्स स्पेशल

आसुद येथील गुरांच्या दवाखान्यात वणंद, सालदुरे, आंबवली खुर्द, मुरूड, कर्दे, हर्णे, पाळंदे आणि पाजपंढरी येथील पशुपालक पशुवैद्यकीय सेवा मिळविण्यासाठी येथे येत असतात. साधारणपणे 8 किलोमीटर लांबीचे अंतर काटून उपचारासाठी आणलेल्या गुरांना उपचार मिळणे तर दूरच परंतु स्थानिक शेतकऱ्यांच्या गुरांनाही शासकीय वैद्यकीय सेवेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना आपल्या गुरांवर खासगी पशुवैद्यांकडून महागडा इलाज करून घ्यावा लागतो आहे. याची सर्व सामान्य शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंडांची झळ सोसावी लागत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg