loader
Breaking News
Breaking News
Foto

​तिरोडा-खासेवाडी येथील नवीन साकवासाठी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची भेट

सावंतवाडी (प्रतिनिधी) : तिरोडा खासेवाडी येथील लोखंडी साकव दरवर्षी नादुरुस्त होत असल्याने तो वारंवार दुरुस्त करावा लागतो. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून तेथे नवीन साकव मंजूर करावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांच्याकडे एका भेटीद्वारे केली आहे. या शिष्टमंडळात तिरोडा गावच्या सरपंच प्रियंका सावंत, उपसरपंच संदेश केरकर आणि नानोसच्या सरपंच साक्षी शेट्ये यांचा समावेश होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या साकवाचा वापर तिरोडा, नानोस, रेड्डी आणि शिरोडा येथील ग्रामस्थांना सातत्याने करावा लागतो. शाळकरी विद्यार्थ्यांना शिरोडा हायस्कूलमध्ये जाण्यासाठी, तसेच नागरिकांना जिल्हा ग्रामीण रुग्णालय, बाजारपेठ आणि शेतीच्या कामांसाठी हा साकव दैनंदिन गरजेचा व महत्त्वाचा दुवा ठरला आहे. या मागणीची दखल घेत कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांनी, या साकवाचे तातडीने एस्टीमेट (अंदाजपत्रक) तयार करून ते जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठवले जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. तसेच उपअभियंता अजित पाटील यांना याबाबतचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

टाईम्स स्पेशल

साकवाचा प्रस्ताव सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्यापूर्वी, साकवाकडे जाणाऱ्या रस्त्याची/वाटेची नोंद ग्रामपंचायतीने आपल्या 'रेकॉर्ड नंबर २३' वर करणे कायदेशीरदृष्ट्या गरजेचे आहे. ही पूर्तता झाल्याशिवाय प्रस्ताव पुढे पाठवता येणार नाही, अशी तांत्रिक अडचण आणि आवश्यक मार्गदर्शन कार्यकारी अभियंता यांनी शिष्टमंडळाला केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दाखवलेली तत्परता आणि केलेल्या योग्य मार्गदर्शनाबद्दल शिष्टमंडळाच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg