loader
Breaking News
Breaking News
Foto

चवंडे वठारच्या दुर्गेश चवंडे यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक भरारी

रत्नागिरी तालुक्यातील चवंडे वठार येथील सुपुत्र दुर्गेश लिकेश चवंडे यांनी थायलंडमधील जागतिक कीर्तीच्या एशियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी, थायलंड येथून मास्टर ऑफ आक्वाकल्चर अंड एक्वेटिक रिसोर्सेस मॅनेजमेंट ही पदव्युत्तर पदवी उत्कृष्ट श्रेणीत (Excellent Grade) संपादन करून रत्नागिरी जिल्ह्याचे तसेच कोकणाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. दुर्गेश यांचे बालपण कोकणातील समुद्रकिनारी वातावरणात गेले. मत्स्य व्यवसायाशी संबंधित कुटुंबीय पार्श्वभूमी आणि जलचर क्षेत्राविषयी असलेल्या आवडीमुळे त्यांनी मत्स्यशास्त्र क्षेत्रात करिअर घडविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शिर्गाव, रत्नागिरी येथील शासकीय मत्स्यव्यवसाय अभियांत्रिकी महाविद्यालयातून (Diploma in Fisheries Engineering) शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी कॉलेज ऑफ फिशरीज, रत्नागिरी (डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ) येथून Bachelor of Fisheries Science (B.F.Sc.) पदवी प्राप्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उच्च शिक्षणासाठी त्यांची निवड थायलंडमधील प्रतिष्ठित एशियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी, थायलंड येथे झाली. या शिक्षणासाठी त्यांना स्कॉलरशिप तसेच रिसर्च असिस्टेंटशिप प्राप्त झाली. AIT मधील शिक्षणादरम्यान त्यांनी Freshwater Giant Prawn (Macrobrachium rosenbergii) यावरील पोषण, आरोग्य व्यवस्थापन व पर्यावरणीय ताण सहनशीलता या विषयांवर संशोधन केले. त्यांचे संशोधन कार्य डॉ. सालिन क्रिष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले असून संशोधनाचे निष्कर्ष आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकात प्रकाशित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. AIT मध्ये प्रवेश मिळविण्यापासून ते संपूर्ण पदव्युत्तर शिक्षण प्रवासात डॉ. बी. आर. चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे दुर्गेश यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण व संशोधनाची संधी मिळाली. त्यांच्या शैक्षणिक प्रवासात शिर्गाव येथील मत्स्यव्यवसाय अभियांत्रिकी महाविद्यालयातील डॉ. एम. एम. शिरधंकर, डॉ. केतन चौधरी, डॉ. राकेश जाधव, डॉ. तौसिफ काझी, डॉ. निलेश मिरजकर, डॉ. सुशील कांबळे आणि डॉ. रोहित भुर्ते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

टाईम्स स्पेशल

तसेच कॉलेज ऑफ फिशरीज, रत्नागिरी येथील डॉ. दाबीर पठाण, डॉ. अनिल पावसे, डॉ. इंदुलकर, डॉ. श्रीकांत शारंगधर, डॉ. सुरेश नाईक, डॉ. संदेश पाटील, डॉ. आर. एम. तिबिले, डॉ. अनिरुद्ध आढसुळ, डॉ. वर्षा भाटकर, डॉ. अजय देसाई, डॉ. सुहास वसावे, डॉ. राम निर्मळे आणि डॉ. मकरंद शारंगधर यांचेही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. कोकणातील एका छोट्याशा गावातून जागतिक दर्जाच्या संस्थेत उच्च शिक्षण पूर्ण करून संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल चवंडे वठार परिसरासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून दुर्गेश चवंडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यात मत्स्य व जलचर संसाधन व्यवस्थापन क्षेत्रात संशोधक म्हणून कार्य करून शाश्वत मत्स्य व्यवसाय व जलचर संशोधन क्षेत्रात योगदान देण्याची त्यांची इच्छा आहे. यावेळी दुर्गेश चवंडे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “आजपर्यंतचा हा प्रवास केवळ माझा नाही. माझ्यावर विश्वास ठेवणारे, प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणारे, प्रोत्साहन देणारे आणि मला पुढे जाण्याची प्रेरणा देणारे माझे आई-वडील, कुटुंबीय, शिक्षक, मार्गदर्शक, मित्र आणि सहकारी यांच्या पाठिंब्यामुळेच हे यश शक्य झाले आहे. या प्रवासात ज्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे योगदान दिले त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg