loader
Breaking News
Breaking News
Foto

हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दीनिमित्त लांज्यात भगवा सप्ताहाचे आयोजन

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दीनिमित्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष व अंगीकृत संघटना लांजा तालुक्याच्यावतीने दिनांक 13जून ते 19 जून या कालावधीत भगवा सप्ताह जनसंपर्क अभियान साजरा करण्यात येणार आहे. या दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शनिवार 13जून रोजी तालुक्यातील इयत्ता 10वी12वी परीक्षेत पहील्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा, देवरुख मराठा भवन येथे सकाळी 10वाजता, 14जून रोजी वृक्ष लागवड केदारलींग मंदीर वेरवली बुद्रुक सकाळी 11वाजता, 15जून रोजी रक्तदान शिबिर शिवसेना कार्यालय लांजा येथे सकाळी 11वाजता, 16जून रोजी विवली, शिपोशी, आसगे, वेरवली खुर्द या गावात शाखा फलक अनावरण, 17जून रोजी खावडी, गोळवशी, पूनस, कुर्णे या गावात शाखा फलक अनावरण सकाळी 11वाजता, 18जून रोजी शिवसेना कार्यालय लांजा येथे सकाळी 10 वाजता विवीध क्षेत्रातील महीलांचा सर्वोत्कृष्ट कामगिरी व जनतेला सेवा दिल्याबद्दल गौरव, शुक्रवार 19 जून रोजी शिवसेना पक्षाचा वर्धापनदिन कार्यक्रम पक्ष कार्यालयात सकाळी 10वाजता साजरा करण्यात येणार आहे, असे विविध कार्यक्रम होणार आहेत असे तालुका प्रमुख युवराज हांदे यांनी जाहीर केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg