loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगड मध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा कोयत्याने खून, कोंडगाव हादरले, पती अटकेत

खेड (प्रतिनिधी) - मंडणगड तालुक्यातील कोंडगाव येथे चारित्र्याच्या संशयातून एका २२ वर्षीय विवाहित महिलेचा तिच्याच पतीने कोयत्याने वार करून निघृण खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. ६ जून) दुपारी घडली. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून कोंडगाव परिसर शोकमग्न झाला आहे. मृत महिलेचे नाव वैशाली मंगेश पवार (वय २२) असे असून त्या कोंडगाव येथील रहिवासी होत्या. तर या प्रकरणातील आरोपी मंगेश निलेश पवार (वय २५) याला मंडणगड पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मंगेश पवार याला पत्नीच्या चारित्र्याबाबत संशय होता. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शनिवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास वैशाली पवार या आपल्या घरासमोरील चिंचेच्या झाडाखाली उभ्या असताना आरोपीने अचानक त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे वैशाली यांना बचाव करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. आरोपीने त्यांच्या डोक्यावर आणि शरीराच्या वरच्या भागावर वार केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. काही क्षणांतच त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. हल्ला इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान मंडणगड पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिसराची पाहणी केली आणि पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी मृत महिलेचे नातेवाईक रामभाऊ सखाराम पवार यांनी मंडणगड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी मंगेश पवार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम १०३ (१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. खुनामागील नेमकी पार्श्वभूमी, कौटुंबिक वादाचे स्वरूप आणि इतर कारणांचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, अवघ्या २२ वर्षांच्या तरुण विवाहितेचा संशयाच्या भावनेतून झालेला दुर्दैवी अंत परिसरातील नागरिकांना चटका लावून गेला आहे. कोंडगावमध्ये दिवसभर या घटनेची चर्चा सुरू होती. कौटुंबिक वाद आणि संशयातून घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी सामाजिक स्तरावर जनजागृतीची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे. मंडणगड पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg