वरवेली गणेश किर्वे : वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने व्यापक पातळीवर 'झिरो एक्सडेंट ड्राईव्ह' ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्राणघातक अपघातांचे प्रमाण किमान १० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली १ जूनपासून ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेअंतर्गत वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी, व्यापक जनजागृती आणि विविध यंत्रणांशी समन्वय साधून अपघात प्रतिबंधासाठी बहुआयामी उपाययोजना करण्यात येत आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आल्याने या मोहिमेची तीव्रता अधोरेखित झाली आहे. तसेच मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली असून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधातही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
केवळ दंडात्मक कारवाईवर भर न देता नागरिकांमध्ये वाहतूक शिस्तीची जाणीव निर्माण गुहागर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शृंगारतळी बाजारपेठ व पोलीस चौकी, गुहागर शहर, आबलोली बाजारपेठ व पोलीस चौकी येथे विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे तसेच विविध संस्थांमध्ये मार्गदर्शन सत्रे, संवाद कार्यक्रम आणि रस्ते सुरक्षा अभियानांचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रांची ओळख करून त्याठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजनांनाही गती देण्यात आली आहे. तालुक्याचे मुख्य बाजारपेठ असलेल्या शृंगारतळी बाजारपेठ मध्ये वाहतूक सुरक्षा उपाययोजना अधिक गतीने राबविण्यात आल्या आहेत. तसेच संभाव्य अपघात क्षेत्रांमध्ये सूचना फलक, वेगमर्यादा दर्शविणारे फलक आणि दिशादर्शक फलक बसविण्यात आले आहेत.
रस्ते सुरक्षा ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित करत गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत हे स्वतः व पोलीस कर्मचारी वाहनचालकांना मद्यपान करून वाहन चालविणे टाळण्याचे, वेगमर्यादांचे काटेकोर पालन करण्याचे, दुचाकीस्वारांनी हेल्मेट तर चारचाकी चालकांनी सीट बेल्टचा वापर करण्याचे आवाहन करत असल्याचे दिसत आहेत.



































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.