२२ वर्षांनंतर पहिल्याच फेरीत विजय मिळवणारे ठरले मानकरी; महाराष्ट्र, गोवा आणि दिव-दमण सर्व भागातून मिळाली प्रथम पसंतीची मते.महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या (BCMG) अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत ॲड. पारिजात पांडे (अनुक्रमांक ९६) यांनी प्रथम पसंतीच्या मतांचा कोटा यशस्वीरीत्या पूर्ण करत एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजय संपादन केला आहे. दिव-दमणपासून ते गडचिरोलीच्या सिरोंचापर्यंत आणि गोव्यापासून ते विदर्भातील गोंदियापर्यंतच्या वकील वर्गाने ॲड. पारिजात पांडे यांना भरघोस मतांनी विजयी करत त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल निवडणुकीच्या मतमोजणीत एकूण झालेल्या वैध मतदानाचा विचार करता यंदा ३,६८३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. पहिल्याच फेरीपासून ॲड. पारिजात पांडे यांनी आपले वर्चस्व कायम राखले. प्रथम पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण झाली तेव्हा त्यांनी कोट्याचा आकडा पार करत ३,७२६ मते मिळवली आहेत व ते विजयी झाले आहेत.
या विजयाला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. यापूर्वी सन २००४ च्या बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. अनिरुद्ध चौबे यांनी प्रथम पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण करून थेट विजय मिळवला होता. त्यानंतर तब्बल २२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर असा चमत्कार घडवून आणण्याचा मान ॲड. पारिजात पांडे यांनी मिळवला आहे. पहिल्याच फेरीत कोटा पूर्ण करून निवडून येण्याची ही कामगिरी वकील वर्तुळात प्रचंड कौतुकाचा विषय ठरत आहे. ॲड. पारिजात पांडे यांच्या या विजयाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना केवळ एका विशिष्ट भागातून नाही, तर संपूर्ण कार्यक्षेत्रातून वकिलांचा कौल त्यांना मिळाला आहे.महाराष्ट्र राज्यातील सर्वच्या सर्व ३६ जिल्ह्यांमधील सुमारे १४४ पेक्षा जास्त तालुक्यांमधून ॲड. पारिजात पांडे यांना प्रथम पसंतीची मते मिळाली.तसेच गोवा राज्यात व केंद्रशासित प्रदेश दीव, दमण आणि दादरा-नगर हवेली येथूनही त्यांना मतदारांनी प्रथम पसंती दिली आहेत.थोडक्यात दिव-दमण पासून ते गडचिरोलीच्या सिरोंचा पर्यंत, गोवा व कोकणातल्या सावंतवाडी पासून ते विदर्भातल्या गोंदिया पर्यंत ॲड. पारिजात पांडे यांना सर्वत्रच भरघोस मते मिळाली आहेत.
आपल्याला बार कौन्सिल सदस्य म्हणून मिळणाऱ्या अधिकारांचा पूर्ण उपयोग वकील वर्गाच्या सर्वांगीण हितासाठी सर्व शक्तीनिशी करण्यासाठी तत्पर असेन अशीच प्रतिक्रिया निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर देखील ॲड. पारिजात पांडे यांनी व्यक्त केली आहे. ॲड. पारिजात पांडे यांच्या या अलौकिक आणि अभूतपूर्व विजयानंतर संपूर्ण महाराष्ट्र, गोवा दिव दमण येथील वकील वर्ग आणि विविध जिल्हा व तालुक्यातील वकील संघटनांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.