loader
Breaking News
Breaking News
Foto

रोणापाल येथे बीएसएनएल कंपनीच्या टॉवरमधील केबिनचे कुलून तोडून बॅटर्‍यांची चोरी

बांदा (प्रतिनिधी) - रोणापाल येथे असलेल्या बीएसएनएल कंपनीच्या टॉवरमधील फायबर केबिनचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २४ हजार रुपये किमतीच्या २४ बॅटर्‍या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोनापाल येथील मोबाईल टॉवरच्या फायबर केबिनचा दरवाजा फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर अमरराजा कंपनीच्या वापरातील २४ ड्राय बॅटर्‍या लंपास केल्या. चोरीस गेलेल्या प्रत्येक बॅटरीची किंमत सुमारे एक हजार रुपये असून एकूण २४ हजार रुपयांचा माल चोरीस गेला आहे. ही घटना २ जून रोजी रात्री उशिरा घडल्याचे समोर आले असून याबाबत कंपनीचे पेट्रोलिंग ऑफिसर सुहास दत्ताराम चव्हाण (रा. वेरळ, ता. लांजा, जि. रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू असून पुढील तपास बांदा पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक बाबींंची पडताळणी सुरू असून बांदा पोलीस पुढील तपासणी करीत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg