खेड (प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातील हर्णे-आंजर्ले बायपास रोडवरील लेमन ट्री हॉटेलच्या आवारात सोमवारी सायंकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातात ३ वर्षे ८ दिवस वयाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेचारच्या सुमारास सान्वी गणपती राठोड ही आपल्या कुटुंबासोबत हॉटेल परिसरात होती. ती वडाच्या झाडाखाली झोपलेली असताना आरोपी बापू हिरामण पवार (रा. सुतारकोड-जालगाव, ता. दापोली) यांनी त्यांच्या ताब्यातील क्रेटा कार (ΜΗ 08 AX 5887) रिव्हर्स घेताना निष्काळजीपणे व अविचाराने वाहन चालविल्याचा आरोप आहे. यावेळी गाडी सान्वीच्या डोक्यावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी सान्वीचे वडील गणपती प्रेम राठोड (वय ३८, सध्या रा. खेडर्डी फाटा, ता. दापोली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६(१), २८ 88 १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत सान्वी गणपती राठोड हिच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.