loader
Breaking News
Breaking News
Foto

जे. ई. ई. ॲडव्हान्स परीक्षेत रोटरी स्कूलच्या 16 विद्यार्थ्यांचे सुयश

खेड (प्रतिनिधी) - माहे मे मध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या जे. ई. ई. ॲडव्हान्स प्रवेश परीक्षेमध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलचे इ. 12वी विज्ञान शाखेतील 16 विद्यार्थी जे. ई. ई. ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. जे. ई. ई. ॲडव्हान्स प्रवेश परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये रेहान मुल्ला, करण कांबळे, सोहम खोपटकर, पार्थ चव्हाण, पवन देवकाते, मानस पालकर, सम्यक शिर्के, आयुषी सावंत, श्रेणी गायकवाड, निलय फुलझेले, स्पंदन मोरे, स्मृती साळवी, संदेश गोखले, आशिष मोहिते, अथर्व बोंडले, रुद्राक्ष मोरे यांचा समावेश असून या विद्यार्थ्यांनी आय. आय. टी. व एन. आय. टी. इंजिनिअरिंग काॅलेजमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मॅथ्स्, फिजिक्स व केमेस्ट्री या विषयाचे विषय शिक्षक, वर्गशिक्षक व परीक्षा विभागातील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी जे. ई. ई. ॲडव्हान्स परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg