loader
Breaking News
Breaking News
Foto

आनंदाची बातमी; लाडक्या बहिणींसाठी सरकारने वर्ग केला 345 कोटींचा निधी, मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार?

मुंबई. राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एकीकडे पडताळणी प्रक्रियेनंतर लाखो महिला योजनेतून अपात्र ठरत असताना, दुसरीकडे पात्र लाभार्थी महिलांना मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान, राज्य सरकारने योजनेसाठी 345 कोटी रुपयांचा निधी वर्ग केल्याची माहिती समोर आल्याने लाभार्थींना दिलासा मिळाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महिला व बालविकास विभागाकडून लाभार्थी महिलांच्या खात्यात हप्ते जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. निधी वितरणासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आल्याने मे महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, यासंदर्भात अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. प्रशासनाकडून जिल्हानिहाय लाभार्थींची माहिती, बँक खात्यांची पडताळणी आणि पात्रतेची अंतिम छाननी सुरू असल्याने काही भागांत हप्ता जमा होण्यास विलंब होत असल्याचेही सांगितले जात आहे.

टाइम्स स्पेशल

योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांची राज्यभरात मोठ्या प्रमाणावर पडताळणी सुरू आहे. शासनाच्या निकषांनुसार अपात्र ठरणाऱ्या लाभार्थींची नावे यादीतून वगळली जात आहेत. उत्पन्न मर्यादा, कुटुंबातील सदस्यांची आर्थिक स्थिती, शासकीय नोकरी तसेच इतर योजनांमधून मिळणारे लाभ यासारख्या बाबींची तपासणी केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg