loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेल व खांदा कॉलनी वीज समस्येवर तोडगा; ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पनवेल : खांदा कॉलनी व पनवेल परिसरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना अनेक वर्षांपासून मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः उन्हाळ्यात वाढलेल्या वीजखंडितीमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. नागरिकांचा रोष असल्याने त्यावर उपाय योजना करण्यासाठी ही बैठक मुंबई येथे नरिमन पॉईंट मंत्रालयाच्या कार्यालयात झाली व पनवेल आणि खांदा कॉलनीतील तातडीने काम करण्यासाठी आदेश देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या समस्येच्या कायमस्वरूपी बैठकीत आमदारांनी सुचविलेल्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करून अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा सुनिश्चित करण्याबाबत चर्चा झाली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला रवीशेठ पाटील, नगरसेवक दशरथ म्हात्रे तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. संबंधित यंत्रणांनी आवश्यक कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांची वीज समस्या सोडवावी, अशी मागणी करण्यात आली. या बैठकीमुळे पनवेल व खांदा कॉलनीतील वीज प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg