दापोली (प्रतिनिधी) : आंजर्ले येथील कडयावरील गणपती मंदिरात बुधवारी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठीच गर्दी केली होती. मात्र येथील मंदिर व्यवस्थापन कमिटीने भक्तगणांच्या दर्शनासाठीची उत्तम व्यवस्था केल्याने आलेल्या सर्वच भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता आले. दापोली तालुक्यातील आंजर्ले कडयावरील श्री गणपती देवस्थान हे सुप्रसिद्ध देवस्थान आहे. अशा या आंजर्ले गावाचे मुळ नाव अजरालय असे होते. सध्या मात्र आंजर्ले हेच नाव प्रचलित आहे. अशा या आंजर्ले गावातील एका टेकडीवर कडयावरील श्रीगणपती मंदिर आहे. या मंदिरातील श्री गणेशाच्या मुर्तीचे वर्णन करताना शब्द अपुरेच पडतात.
अशा या मन प्रसन्न करणा-या या देवतेचे दर्शन घेताच लाभणारी प्रसन्नता आणि मनाला मिळणारी शांती तसेच समाधान यामुळे श्रध्दा असलेले भाविक या मंदिरात श्रीं च्या दर्शनासाठी नियमित येतातच शिवाय फार दुरदुर वरुन देखील दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यात आज बुधवारी ३ जून रोजी संकष्ट चतुर्थी आल्याने दापोली परिसरातील भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होतीच शिवाय पर्यटनासाठी दापोलीत आलेल्या पर्यटकांनींही संकष्टी चतुर्थीनिमित्त येथे येऊन श्री कडयावरील गणपतीचे आवर्जून दर्शन घेतले. दुपारच्यावेळी येथे आलेल्यांना दुपारच्या महाआरतीचाही लाभ मिळाला. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर भक्तिभावाच्या समाधानाचे भाव पाहायला मिळाले.











































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.