loader
Breaking News
Breaking News
Foto

रब्बी स्पर्धेत राजापूरच्या खेळाडूंची दमदार कामगिरी; पुणे बालेवाडीसाठी संघाची निवड

राजापूर (तुषार पाचलकर) - गुहागर येथे आयोजित करण्यात आलेल्या रग्बी स्पर्धेत राजापूर तालुक्यातील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. या यशामुळे राजापूर तालुक्याच्या शालेय क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. या स्पर्धेत राजापूर तालुक्यातील विविध नामांकित शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. जि. प. शाळा ओझर नं. १, जि. प. शाळा तळवडे नं. १ तसेच ओझर हायस्कूलच्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कौशल्य, शिस्त आणि संघभावनेच्या जोरावर स्पर्धेत दमदार कामगिरी नोंदवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेतील उल्लेखनीय यशामुळे आता १४ जून २०२६ रोजी पुणे येथील बालेवाडीमध्ये होणाऱ्या १२ वर्षांखालील मुला-मुलींच्या राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेसाठी राजापूर तालुक्याचे संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत. खेळाडूंना प्रशिक्षक युवराज मोरे, शैलेन्द्र बंदसोडे आणि क्रीडा मार्गदर्शक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच पालकांनीही खेळाडूंना प्रोत्साहन देत त्यांच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली. राजापूर तालुक्यातील क्रीडाप्रेमींनी विजयी खेळाडू आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन करून आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg