loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-मंडणगड (सडे मार्गे) एस.टी. बसला शेनाळेत अपघात, 18 प्रवासी बालंबाल बचावले

मंडणगड (प्रतिनिधी) : राजेवाडी ते आंबडवे या राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट स्थितीतील कामामुळे मंडणगडात अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस कमालीची वाढ होत चालली आहे. अशाच प्रकारची अपघाताची घटना मंगळवारी पहाटे ५.३० वाजता शेनाळे हद्दित घडली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणाही प्रवाशांना दुखापत झाली नाही. मुंबई सेंट्रल येथून रात्री १२ वाजता मंडणगड येथे येण्यासाठी प्रवाशांना घेऊन निघालेली नियमित मुंबई सडे मार्गे मंडणगड ही एस.टी. बस शेनाळे येथे पहाटे ५.३० वाजता आली असता मुंबई आगाराची एस .टी. बस क्रमांक एमएच २० ईएल २१९० रस्ता सोडून दरीकडील भागाकडे कलंडली. एस.टी. बस रस्ता सोडून दरीकडील बाजूस कलंडल्याने अपघात घडला. मात्र एस. टी. बसमधील प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून त्यांच्या सुदैवाने बस मधील सर्व प्रवासी बालंबाल बचावले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या झालेल्या दूर्देवी अपघातात एस.टी.बसमधून प्रवास करणारे सर्वच्या सर्व १८ प्रवासी सुखरूप बचावले. या झालेल्या अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच तत्काळ शिरगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि शेनाळे गावाचे सुपुत्र विश्वनाथ सावंत यांच्यासह सुनील साळवी, विकी कदम, विवेक वाडकर आदींसह शेनाळे येथील स्थानिक ग्रामस्थांनी प्रवाशांना मदतीचा हात देत पुढील त्यांच्या इप्सित जाण्याच्या ठिकाणी प्रवासासाठी रिक्षा उपलब्ध करून देत प्रवास सोपा करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंडणगड तालुक्यातील मूळ गावी आंबडवे येथे जाण्यासाठी राजेवाडी ते आंबडवे या नव्याने तयार करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे.

टाईम्स स्पेशल

या राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट कामामुळे अपघाताचे प्रमाण खूपच वाढले आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील ८ वर्षांपासून सुरू आहे. महामार्गाच्या कामासाठी ठिकठिकाणी खडी, वाळू आदी साहित्य रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आलेले आहे. मात्र ठेवण्यात आलेले ते खडी सदृष्य साहित्य सगळीकडे पसरत चालल्याने खडी आणि रेती सारखे साहित्य रात्रीच्या अंधारातील अंधुक प्रकाशात वाहन चालकांना धड दिसत नाही, त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या खडी, रेती मुळेच सदरचा अपघात घडल्याचे बोलले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg