loader
Breaking News
Breaking News
Foto

विद्या जालगावकर यांना राज्यस्तरीय सेवासन्मान पुरस्कार

वेळणेश्वर (उमेश शिंदे) : जिल्हा परिषद शाळा पिंपळी खुर्द येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका विद्या गोविंद जालगावकर यांना राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले आहे. शिक्षक फाऊंडेशनद्वारे संचलित महाराष्ट्र शिक्षक पॅनेल यांच्या वतीने शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले योगदान आणि शैक्षणिक उपक्रमांमधील सक्रिय सहभाग याची दखल घेऊन त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून अभिनेत्री भार्गवी चिरमुले, कवी रोहित शिंगे, कवयित्री गुंजन पाटील यांची उपस्थिती लाभली होती. तसेच महाराष्ट्र शिक्षक पॅनेलचे अध्यक्ष दिपक चामे व सचिव कोळी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्या जालगावकर यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून तसेच परिसरातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg