loader
Breaking News
Breaking News
Foto

सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात

आबलोली (संदेश कदम)- गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी आबलोली पंचक्रोशीतील इयत्ता १० वी, इयत्ता १२ वीच्या बोर्डाच्या परिक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थांचा आणि स्पर्धा परिक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा तसेच एम. एस. सी. आय.टी.च्या परिक्षेला बसणा-या विद्यार्थांचा शुभेच्छा कार्यक्रम सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीच्या प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीचे संचालक संदेश साळवी यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर एम. एस. सी.आय.टी. उत्तीर्ण विद्यार्थांचा भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यानंतर इयत्ता १० वी, इयत्ता १२ वी मधील शालांत परिक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थांचा व स्पर्धा परिक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.

टाइम्स स्पेशल

यावेळी निर्मल ग्रामपंचायत खोडदे या ग्रामपंचायतचे सरपंच ऍड. प्रतिक पवार, ग्रामविकास अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, उद्योजक गजानन साळवी, सेवानिवृत्त गव्हर्मेंट ऑडीटर जगदीश साळवी, पत्रकार संदेश कदम यांनी विद्यार्थांना मौलिक मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन कु.आर्या प्रशांत साळवी हिने केले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीच्या संचालिका सौ. सावी साळवी, शुभम सावंत, साक्षी सावंत, प्रवीण आचरेकर, सिद्धी डिंगणकर, सलोनी मोहिते, विशाखा झगडे यांनी विशेष प्रयत्न केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg