loader
Breaking News
Breaking News
Foto

अष्टगणकोट समर्थगड आडवली येथे स्वामी भक्त आणि सेवेकरी यांच्या श्रमदानातून स्वामी समर्थ मठाकडे येणाऱ्या रस्त्याची डागडुजी

मालवण (प्रतिनिधी) - भक्ती आणि सेवेची अनोखी प्रचिती देत, अष्टगणकोट समर्थगड आडवली येथे स्वामी भक्त आणि सेवेकरी यांच्या अभूतपूर्व श्रमदानातून स्वामी समर्थ मठाकडे येणाऱ्या सुमारे ३ किलोमीटर रस्त्याची डागडुजी करण्यात आली. केवळ सेवेच्या भावनेतून भक्तांनी एकत्र येत हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे योग्य बनवला आहे. हा रस्ता पक्का डांबरी करावा अशी मागणी स्वामी भक्तांमधून होत आहे. ​अष्टगणकोट समर्थगड येथील मठात दर्शनासाठी दररोज शेकडो स्वामी भक्त येत असतात. मात्र, मठाकडे येणारा सुमारे ३ किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झाला होता. खड्डे आणि दुरवस्थेमुळे वाहनचालकांना, तसेच पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही समस्या सोडवण्यासाठी मठाचे सेवेकरी आणि स्वामी भक्तांनी स्वतःहून पुढाकार घेण्याचे ठरवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शेकडो स्वामी भक्तांनी आणि सेवेकऱ्यांनी हातात कुदळ, फावडे घेऊन श्रमदानाला सुरुवात केली. रस्त्यावरील खड्डे भरणे, झाडीझुडपे छाटणे आणि रस्ता समपातळीत आणण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे या ३ किमी रस्त्यांचे रूप पालटले. ​या श्रमदानामुळे आता मठाकडे येणारा मार्ग सुकर झाला असून, वाहतुकीची मोठी कोंडी आणि अडथळे दूर झाले आहेत. स्वामी भक्तांनी दाखवलेल्या या 'स्वावलंबी' आणि 'सेवाभावी' वृत्तीचे परिसरात कौतुक होत आहे.​

टाईम्स स्पेशल

​"केवळ मंदिराच्या गाभाऱ्यात पूजा करणे म्हणजे सेवा नव्हे, तर मठात येणाऱ्या प्रत्येक भक्ताचा मार्ग सुकर करणे हीच खरी स्वामी सेवा आहे," अशी भावना यावेळी मठाचे अध्यक्ष सुनिल घाडीगावकर यानी व्यक्त केली. यावेळी माजी सभापती राजु परुळेकर, रमेश घाडीगावकर, सोनू सावंत, यशवंत कुबल, सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सेवेकऱ्यांनी श्रमदान केले. मठाच्या वतीने अल्पोपहार आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वांचे आभार मठाच्या वतीने सुनिल घाडीगावकर यानी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg