संगलट (खेड) (प्रतिनिधी) - तालुक्यातील केळसकर नाका परिसरात अन्न सुरक्षा विभागाने केलेल्या कारवाईत प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 10 जून 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4.45 वाजण्याच्या सुमारास केळसकर नाका, दापोली येथे ही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या फिर्यादीवरून संशयित अशफाक महमूद मनियार (वय 62, रा. दापोली) याच्याविरुद्ध भारतीय अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तपासादरम्यान आरोपीकडून प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा विक्रीसाठी व वाहतुकीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळून आले. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार गुटखा, पान मसाला व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री व साठवणुकीस बंदी असतानाही त्याची विक्री सुरू असल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान सुमारे ₹1678 किमतीचा विमल पान मसाल्याचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आरोग्यास गंभीर हानीकारक असल्याने अशा पदार्थांच्या विक्री व साठवणुकीवर प्रशासनाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.





































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.